पोस्ट्स

सांगोला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा माता, बालकांच्या उत्कर्षाची... (उत्तरार्ध)

इमेज
    डॉ. संजीवनी केळकर यांचं  मनोगत ग्रामीण महिलांनी चालवलेली महिलांसाठी काम करणारी महिलांची सेवाभावी नोंदणीकृत ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात १९७८पासून कार्यरत आहे. केवळ सहसंवेदनेच्या पायावर उभ्या राहिलेल्या आणि महिलांनी जिद्दीने यशस्वी केलेल्या या परिवर्तन चळवळीचा प्रवास शब्दांकित करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘देवराई’. १९७८ ते २०२५ या कालखंडात या संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रवासाचं सिंहावलोकन करण्यासाठी मी मागे वळून पाहते तेव्हा माझं मलाच नवल वाटतं. कारण या प्रवासाची वाट रुळलेली नव्हती. या वाटेवर धोक्याची वळणं होती. कधी पायाखाली रुतणारे काटे होते. कधी हिरवळही होती. कधी पावसाचा प्रसन्न शिडकावा. तर कधी मुसळधार पाऊस. कधी तप्त सूर्याचे प्रखर किरण. तर कधी क्वचित मिळणारी थंडगार सावली. याशिवाय या प्रवासाचा पल्लाही खूप लांबचा होता. हे सगळं ‘साहून’ मी कशी काय तग धरून राहिले? काय होतं माझ्याजवळ? माझं माहेर संपन्न. सुसंस्कृत आणि माणुसकी जपणारं होतं. आजही आहेच. आजही संस्थेच्या कुठल्याही कामाला गोडबोले मंडळींचं नेहमीच सहकार्य असतं....

कथा माता, बालकांच्या उत्कर्षाची... (पूर्वार्ध)

इमेज
  आपल्या देशात ग्रामीण महिला हा आजपर्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेला घटक आहे. तिच्या समस्या व त्यांवरील उपाययोजना यांवर आजपर्यंत काही परिणामकारक कार्यवाही झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर १९७८पासून या महिलांवर एक डॉक्टर म्हणून उपचार करताना त्यांच्या भावविश्वाची मला ओळख होऊ लागली. मूकपणे लाथा-बुक्क्यांचे उन्हाळे सोसत, वेदनांचे सोहळे करून, वरवर हसतमुखाने जगणाऱ्या या महिलांना जमेल तसा आधाराचा, मदतीचा हात दिल्याशिवाय मला चैन पडेना, सुखाने जगता येईना. ही टोचणी, ही अस्वस्थता प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय कमी होणार नाह याची खात्री झाली आणि महिला सबलीकरण हा शब्द अजून अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून मी या समविचारी महिलांसोबत ग्रामीण महिलांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी परिवर्तन चळवळीचे काम सुरू केले. सुदैवाने या कामाला तळमळीने काम करणारे हात आणि कामाचा परीघ आपुलकीने वाढवणारे बुद्धिमान लोक मला मिळाले आणि ग्रामीण महिलांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडून येताना दिसू लागले हे स्वागतार्ह बदल नागरी समाजातील बुद्धिमंत, धोरणे ठरवणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचावेत, ग्रामीण स्त्रियांचे आयुष्...