पोस्ट्स

क्षितिजा करमरकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MAI चे पुढचे पाऊल ...“The MAI Store”

इमेज
मराठी भाषेचे शिक्षण व प्रसार, मराठी सण जपणारे व ती संस्कृती नवीन पिढीमध्ये रुजविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि  जुन्यानव्या पिढीमध्ये सुसंगती राखण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम अंमलात आणण्यासाठी त्यासाठी कोणी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टोअर सुरू करू शकते का? MAI चे उपक्रम आणि एक वस्तूंचे विक्री केंद्र याचा काय संबंध असा प्रश्न तुमच्य मनात लगेच आला असेल.  परंतु मराठी आई उपक्रमाने अतिशय योग्य वेळी हे योग्य पाऊल उचलले आहे. मराठी आई इनिशिएटव्ह काय आहे हे मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिलेच आहे. (https://panvalkar.blogspot.com/2026/02/blog-post_26.html) थोडक्यात सांगायचे तर आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या तरुणीला आधी आई झालेल्या स्त्रीने दिलेला 'आई'चा प्रेमाचा, मदतीचा हात म्हणजे मराठी आई इनिशिएटिव्ह.  सुरुवातीला आठ-दहा महिलांपुरता मर्यादित असणारा हा उपक्रम १५०० पेक्षा अधिक आयांपर्यंत पर्यंत कधी पोहोचला हे त्याच्या  दोघी सहनिर्मात्या  डॉ. सायली नातू आणि  क्षितिजा करमरकर यांना कळलेही नाही. पण एकदा ही संख्या वाढत गेल्यानंतर त्या सर्व महिलांच्...

आईची आई होताना...

इमेज
    क्षितिजा करमरकर आणि डॉ. सायली नातू   कोणत्याही सामाजिक व आर्थिक स्तरातील स्त्री असो, तिला तिच्या पहिल्या बाळाची चाहूल लागली की मनात विलक्षण आनंद आणि त्याचबरोबर बाळाची काळजी हे दोन्ही एकाच वेळेला दाटून येते. बाळ पोटात असतानाचे नऊ महिने आणि नंतर त्या बाळाचा जन्म आणि बाळाचे हळूहळू मोठे होत जाणे हा काळ  अतिशय आनंददायी असला तरी प्रत्यक्ष त्या स्त्रीला त्या सगळ्या दिव्यातून जाताना मनात अनेक प्रश्न येत असतात. त्याची उत्तरे प्रत्येकीला मिळतातच असे नाही. अशा वेळेला आई किंवा सासूबाई किंवा कोणी ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शक म्हणून असली तर फायदा होतो हे खरे असले तरी कोणी समवयस्क स्त्रीने तिचे अनुभव शेअर केले तर मनाला उभारी येते. अशीच एक उत्तर अमेरिकेत राहणारी तरुणी जेव्हा पहिल्या बाळाच्या चाहुलीने आनदित झाली, तेव्हा  सगळे काही नीट होईल ना अशा काळजीतही पडली. तिचे आई-वडील आणि सासुबाई या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्याच. परंतु तरीही पहिल्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणींनी एकत्र येऊन एकमेकींना आधार द्यावा ही कल्पना तिच्या मनात आली आणि ती...