पोस्ट्स

समाजमाध्यमांवरील निर्बंध प्रभावी ठरतील?

   ऑस्ट्रेलियाने १६ वर्षाच्या खालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन लागू केला आहे. त्याबाबत जगभर चर्चा झाली. या निर्णयाला   तेथील स्थानिक न्यायालयांमध्ये आव्हान देण्यात आले आहे. या बंदीनंतर कायकाय समस्या निर्माण झाल्या, मुलांवर किती परिणाम झाला हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. तरी ही बंदी ऐतिहासिक ठरली आहे हे निश्चित.    युरोपीय महा संघातील   देशांमध्ये अशा प्रकार ची बंदी आपण आणू शकतो का याचा विचार चालू आहे. नुक ता च फ्रान्सने त्यांच्या कनिष्ठ सभागृहामध्ये अशा प्रकारे १६ वर्षांखालील मुलांसाठी बंदी घालण्याचा ठराव संमत केला आहे. खरे म्हणजे फ्रान्सने डेन्मार्क, ग्रीस आणि स्पेन या देशांनाही याबाबतची विचारणा केली होती. परंतु या तीन देशांनी अजून तरी तसा ठराव केलेला नाही. युरोपीय महासंघाच्या देशांनी युरोपियन आयोगाच्या प्रमुख यांना सल्ला देण्यासाठी एक  सल्लागार मंडळ  नेमण्याचे ठरवले आहे. २०२५ च्या   शेवटी हे  मंडळ स्थापन होणार होते, परंतु अद्यापपर्यंत त री ते स्थापन झालेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ते होईल अशी अपेक्षा आहे. युरोपियन संसदेने अशा प्र...

धोनीला पर्याय आहे का?

'तुम्ही निवृत्त का होत नाही' यापेक्षा 'तुम्ही निवृत्त का होत आहात' असे लोकांनी विचारले तर ते अधिक चांगले, असे विख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट नेहमी म्हणत असत. अलीकडच्या काळात याचा जास्त प्रत्यय यायला लागला आहे. फक्त क्रिकेटपुरते बोलायचे तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आता महेंद्रसिंग धोनी या तिघांबद्दलही हे प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले आहेत. गेल्या काही महिन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूप कमी दर्जाची होत आहे. मधूनच एखादी उत्तम खेळी केली की जणू 'माझ्यात अजून दम आहे' असे हे खेळाडू सांगतात. पण नंतर पुढचे अनेक डाव ते असफल होतात. खेळाडू मोठा असला तरी त्याची निवृत्ती कधी न कधीतरी होणारच हे गृहीत धरले पाहिजे . भारतीय क्रिकेट नियमक मंडळ किंवा तुमच्या आमच्यासारखे सामान्य क्रिकेटप्रेमी यांच्यापेक्षाही या खेळाडूंनी त्याची जाणीव जास्त ठेवली पाहिजे. पण ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्याचे उदाहरण म्हणजे हे तीनही खेळाडू असे म्हणायला हवे.  या तिघातही महेंद्रसिंग धोनी हा 'चेन्नई सुपर किंग्ज' (सीएसके) संघाचा आधारस्तंभ. ...

सर्वांना जोडणारा दुवा

इमेज
    महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था विविध स्तरांवर काम करत आहेत. समाजाचे भले व्हावे यासाठी समविचारी लोकांच्या मदतीने चांगल्या कामाचे जाळे उभारत आहेत. पुण्यातील 'दुवा' ही अशीच एक संस्था. तिच्या कामाचा हा परिचय. अधिकाधिक लोक त्यात सहभागी होतील आणि हा 'दुवा' बळकट करतील अशी अपेक्षा आहे.            जगात अनादि काळापासून ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असा भेद दिसून येतो. माणूस जसा सुसंस्कृत व्हायला लागला तसं त्याला ही दरी जाणवायला लागली आणि त्यातून या २ वर्गांना जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पुण्यात काम करणारी ‘दुवा’ नावाची एक संस्थाही याच दृष्टीकोनातून निर्माण झाली.           ‘आहे रे’ गटाकडे संसाधनांची विपुलता असते तर ‘नाही रे’ गट किमान गरजा पुरवण्यासाठी धडपडत असतो. त्यातून दुवा संस्थेच्या संचालिका अर्चना गोगटे यांना असं वाटून गेलं की जिथे आहे तिथून, जिथे नाही तिथे जाण्यासाठी एखादा ‘दुवा’ साधता येईल का? सधन घरातली वापरण्यायोग्य अशी भांडी, कपडे, खेळणी, पुस्तकं ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत पोचवता येतील का? आहे...

अर्थसाक्षरतेबद्दल शाळांचे सकारात्मक पाऊल

इमेज
आजच्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नाही असे म्हटले जाते. इयत्ता दहावी, बारावीनंतर अथवा पदवी शिक्षणानंतर तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी नोकरी मिळवण्यासाठी अथवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम आहे का किंवा होते का असा प्रश्न अनेक वेळेला विचारला जातो. केवळ पदवीधर आहे म्हणजे नोकरी करण्यासाठी पुरेसे आहे असे नाही. पदवीचे शिक्षण घेतानाच किंबहुना त्याही आधी शालेय जीवनात अर्थसाक्षरता जर समजली तर किती चांगला परिणाम होऊ शकतो याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सध्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी विषयक बातम्यांच्या रगड्यात या संदर्भातली सकारात्मक बातमी वाचायला मिळाली की बरे वाटते आज दि. नऊ फेब्रुवारी २०२५ च्या 'हिंदुस्तान टाइम्स'मध्ये नीरज पंडित यांनी विद्यार्थ्यांना अर्थसाक्षर बनवण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या शाळांसह अन्य खाजगी शाळांमध्ये कसे प्रयत्न चालू आहेत याची बातमी दिली आहे.  नुकतेच खारच्या लीलावती बाई पोद्दार हायस्कूलमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध देशांमध्ये आर्थिक धोरणे कशी तयार होतात, आपल्या घरातले रोजचे / महि...

शिक्षण क्षेत्रातले प्रयत्न अपुरेच?

  काही दिवसापूर्वी केंद्रीय शिक्षण खात्याने घेतलेल्या एका निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती.  इयत्ता पाचवी आणि आठवी या इयत्तेत जर विद्यार्थी नापास झाले तर त्यांना पुढच्या इयत्तेत न ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची ही बातमी होती. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण नको आणि आठवीपर्यंत त्यांना विनाताण शिकता यावे यासाठी आठवीपर्यंत परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. तो बदलल्यानंतर त्यावर टीका झाली आणि परत विद्यार्थ्यांवरचा मानसिक बोजा वाढेल, तणाव वाढेल असे म्हटले गेले होते. पण यातही नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत जाऊन सुद्धा नीट लिहिता वाचता येत नाही अथवा जे अभ्यासात काहीच प्रगती करू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांचे नववीत गेल्यानंतर काय हाल होतील याचाही विचार केला गेला पाहिजे.  यात संदर्भात आज दिनांक २३ जानेवारीला 'द इकॉनॉमिक टाइम्स' या वृत्तपत्रात आलेल्या बातमीकडे पाहिले पाहिजे असे मला वाटते . जानेवारी महिना संपत आला की विद्यार्थी आणि पालकांनाही वेध लागतात ते दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे. यातली दहावीची ...

बातमी, विश्लेषण आणि अर्थ सांगणारे पुस्तक

इमेज
विख्यात पत्रकार राजीव साबडे यांनी लिहिलेले आणि ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे पुस्तक पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या आणि काही वर्षे पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. ‘एका ज्येष्ठ पत्रकाराने अनुभवलेल्या विविध घटनांचे गोष्टीरूप चित्रण’ असे पुस्तकाच्या सुरुवातीला म्हटले असले तरीही वेगवेगळ्या घटनांचे रिपोर्ताज स्वरूपातले लेखन आणि ती घटना आज अनेक वर्षे होऊन गेली तरी डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे कसब हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. हे संपूर्ण लेखन कधीही कोणताही सवंगपणा आणि भडकपणा येऊ न देता केले असल्यामुळे ते अधिक विश्वासार्ह वाटते. श्री साबडे यांची संपूर्ण कारकीर्द पुण्याच्या 'सकाळ' या वृत्तपत्रात गेली. तब्बल ३४ वर्षे विविध संपादकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना देश-विदेशात वार्तांकन करण्याची संधी मिळाली आणि त्यातल्या काही घटनांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकांमध्ये तेरा प्रकरणे आहेत आणि प्रत्येक प्रकरणातला तपशील हा स्वतंत्रपणे पुस्तक होऊ शकतो इतका भरगच्च आहे. या तेराही विषयांवर यापूर्वी कोणी लेखन केले नाही असे नाही,...

कशासाठी ...रेडिओसाठी !

सध्या तरुण पिढी मोबाईल आणि स्क्रीनच्या मागे लागली आहे, ते त्यात खूप वेळ घालवतात असे आरोप नेहमी होतात. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. त्याचे विपरीत परिणाम मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही होतात. कोरोंनाने सर्व वयोगटातील शाळकरी मुलामुलीना  हातात लवकर मोबाईल दिला असला तरी कोरोना संपल्यावर तो दूर झाला नाही. मुलांना कोणत्याही ताज्या घडामोडींची माहिती नसते असे म्हणता येणार नाही. त्यांचा माहितीचा 'सोर्स' हा वर्तमानपत्रांपेक्षा ऑनलाईन आहे हेही खरे आहे. परंतु मोबाईल, टीव्ही चॅनेल्स, यु ट्यूब यापेक्षा आपल्या सर्वांचा बातम्यांचा / माहितीचा जो मूळ सोर्स होता तो रेडिओ या मुलांपासून लांब गेला आहे. अर्थात याचा दोष त्यांना देता येणार नाही. घरचे ज्येष्ठ रेडिओ न ऐकता मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसणार असतील तर मुलांना सवय तरी कशी लागणार ? आधीपेक्षा कमी, पण आजही अनेक घरांमध्ये रेडिओ ऐकला जातो आणि त्यावर अनेक दर्जेदार कार्यक्रम इथे सादर होत असतात. तुम्ही कितीही ऑनलाईन असाल तरी घरी रेडिओ हवाच यात वाद नाही. काल 'द हिंदू' या नावाजलेल्या दैनिकात रेडिओसंदर्भात एक बातमी वाचली आणि रेडिओच्या आठवणी जाग्...